Join WhatsApp Group

BMC Bharti 2024 | मुंबई महानगरपालिकेत नोकरीची मोठी संधी, मिळणार तब्बल 92,300 रुपये एवढा पगार

BMC Bharti 2024 | मुंबई महानगरपालिकेत नोकरीची मोठी संधी, मिळणार तब्बल 92,300 रुपये एवढा पगार

BMC Bharti 2024 | मुंबईमध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे. ती म्हणजे आता बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC Bharti 2024) परवाना निरीक्षक अंतर्गत एक भरती निघालेली आहे. ही भरती त्यांनी अनुज्ञापननिरीक्षक या पदासाठी काढलेली आहे या. पदाच्या 118 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी त्यांनी आता पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 मार्च 2024 आहे. अर्जाची तारीख संपायला अगदी थोडेच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे तुम्ही जर इच्छुक असाल तर लवकरात लवकर या पदासाठी अर्ज करा.

पदाचे नाव

बृहन्मुंबई महानगरपालिका या भरतीसाठी परवाना निरीक्षक भरती निघालेली आहे.

पदसंख्या

बृहन्मुंबई महानगरपालिका या भरतीसाठी 118 रिक्त जागा आहेत.

शैक्षणिक पात्रता | BMC Bharti 2024
या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे खूप गरजेचे आहे. पदवीधर असणारा कोणताही व्यक्ती यासाठी अर्ज करू शकतो. उमेदवारांकडे सीसीसी किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे एम एस सी आय टी किंवा जीसीआयटीचे प्रमाणपत्र धारण केलेले असणार आवश्यक आहे.

वयोमर्यादा

वरील पदासाठी वयोमर्यादा ही किमान 38 ते कमाल 43 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत

अर्ज शुल्क

खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये अर्ज शुल्क असणार आहे. त्याचप्रमाणे मागास प्रवर्गासाठी हे शुल्क 900 रुपये एवढे आकारण्यात येणार आहे.

वेतन
या पदासाठी 29,200 रुपये ते 92,300 रुपये एवढे वेतन मिळणार आहे.

कागदपत्रे

 

  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जन्माचा दाखला
  • शालांत प्रमाणपत्र पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबाबतचे गुणपत्रिका
  • एमएससीआयटीचे प्रमाणपत्र

Bank Cash Deposit Rule Changed

👉अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा👈

Leave a Comment