Join WhatsApp Group

crop insurance 2023:राज्यातील २४ जिल्ह्यात 2216 कोटी अग्री पिक विमा मंजूर 1690 कोटी वितरित :कृषी मंत्री धनंजय मुंडे 

crop insurance 2023:राज्यातील २४ जिल्ह्यात 2216 कोटी अग्री पिक विमा मंजूर 1690 कोटी वितरित :कृषी मंत्री धनंजय मुंडे

crop insurance 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्यातील 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता 2216 कोटी अग्रीम पिक विमा मंजूर झाला आहे आणि सोळाशे नव्वद कुठे वितरित झाला आहे असं अधिवेशनात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितला आहे एक हजार रुपयांपेक्षा कमी पिक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांनाकि मान एक हजार रुपये मिळणार अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

crop insurance 2023 राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचे जे नुकसान झाले त्याबाबत प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत 24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना 2216 कोटी रुपये इतका अग्रीम पिक विमा 25% प्रमाणे मंजूर करण्यात आला असून त्यापैकी 1690 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे आणि सुमारे 634 कोटी रुपयांचे वितरण वेगाने सुरू आहे अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान दिली आहे.

24 जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीला अनुसरून संबंधित विमा कंपन्या 25% अग्रीम पीक विमा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावरून अधिसूचना काढण्यात आल्या होत्या मात्र त्या विरोधात काही कंपनी जिल्हा प्रशासन आणि विभागीय स्तरावरती अपील केली होती हे फेटाळून लावल्यानंतर पिक विमा कंपनीने राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील केले आहे अशी माहिती देण्यात आली आहे.

खुशखबर..! आत्ता  लिलावात लाखोच्या किंमत असलेल्या गाड्या मिळणार हजारात…

 

crop insurance 2023 या दरम्यान राज्य शासनाच्या वतीने हवामान तज्ञ कृषी विद्यापीठांमधील तज्ञ व्यक्ती सहकार्य घेऊन 21 दिवसाच्या पावसाच्या खंडाचे नियमावर मला अनुसरून तसेच विविध तांत्रिक बाबीच्या दृष्टीने शेतकऱ्याचे झालेले नुकसान कंपन्यांच्या पुढे सिद्ध करून कंपन्यांना विमा देण्यास भाग पाडले काही विमा कंपनीचे अपील अद्याप सुनावणी स्तरावर आहेत तेथील निकाले काढल्यानंतर मंजूर पिक विमा विचारात आणखी मोठी वाढ होणार आहे असेही कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केला आहे.

पिक विमा संदर्भात विधान परिषदेत आमदार शशिकांत शिंदे आमदार विक्रम काळे आमदार सतीश चव्हाण आमदार अरुण लाड आमदार जयंत आजगावकर आमदार राम शिंदे आमदार प्रवीण दरेकर आमदार अमोल मिटकरी या विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनीही प्रश्न उत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला होता आमदार एकनाथ खडसे यांनीही केळी पिक विमा आमदार जयंत पाटील यांनी भात शेती विषय झालेले नुकसान यावर कृषीमंत्री चे लक्ष वेधले धनंजय मुंडे यांनी त्या सर्व प्रश्नांच्या सकारात्मक व समाधानकारक उत्तर देत शासनाचे बाजू मांडली.

या  8 जिल्ह्यामध्ये पुन्हा होणार पावसाला सुरुवात, पहा पंजाबराव डक यांचा अंदाज

 

Leave a Comment