Join WhatsApp Group

 Digital land map जमिनीचा नकाशा आता डिजिटल स्वरूपात! सातबारा सोबत नकाशा मिळणार, वाद होणार कमी जाणून घ्या कसे

Digital land map जमिनीचा नकाशा आता डिजिटल स्वरूपात! सातबारा सोबत नकाशा मिळणार, वाद होणार कमी जाणून घ्या कसे…

Digital land map नमस्कार शेतकरी मित्रांनो जमिनीची नोंदणी आणि मालकी हक्क मालकी हक्क निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक नवीन उपक्रमाची सुरुवात केली आहे या उपक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक तालुक्यात काही निवडक गावांमधील जमिनीचा नकाशा डिजिटल स्वरूपात तयार करण्यात येणार आहे आणि तो संबंधित जमिनीचा सातबारा सोबत जोडला जाणार आहे.

या योजनेसाठी भूमी अभिलेख विभागाने जीआयएस भौगोलिक माहिती प्रणाली तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे या तंत्रज्ञानाचा मदतीने जमिनीचा अक्षांश आणि रेखांश निश्चित करणे शक्य होईल आणि त्यानुसार नकाशा तयार केला जाईल.

Digital land map या योजनेचे अनेक फायदे आहेत जमिनीची अचूक मोजमाप आणि बहुलक भौगोलिक स्थिती निश्चित झाल्यामुळे जमिनीच्या हद्दीबाबतचे वाद-विवाद कमी होण्याची शक्यता आहे तसेच जमिनीची नोंदणी आणि मालकी हक्क निश्चित करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होईल.

या योजनेचा पहिला टप्पा 31 मार्च 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे या टप्प्यात राज्यातील प्रत्येक तालुक्यात ७७२ गावांमधील जमिनीचा नकाशा डिजिटल स्वरूपात तयार करण्यात येणार असून दुसरा टप्पा नोव्हेंबर 2024 मध्ये सुरू होणार आहे.

या योजनेची अंमलबजावणी यशस्वीरित्या झाल्यास जमिनीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यास मदत होईल.

या योजनेचे काही मुख्य मुद्दे

 • जमिनीचा नकाशा डिजिटल स्वरूपात तयार करणे
 • नकाशा संबंधित जमिनीचा सातबारा सोबत जोडणे.
 • जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर
 • जमिनीचे अचूक मोजमाप आणि भौगोलिक स्थान निश्चित करणे.
 • जमिनीच्या अधिबाबतचे वाद विवाद कमी करणे
 • जमिनीची नोंदणी आणि मालकी हक्क निश्चित करण्याची प्रक्रिया सुलभ आणि जलद करणे

या योजनेमुळे नागरिकांना होणार फायदे

 • जमिनीच्या व्यवहारामध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवणे
 • जमिनीच्या हद्दीबाबतचे वाद विवाद कमी होणे
 • जमिनीची नोंदणी आणि मालकी हक्क निश्चित करण्याची प्रक्रिया सुलभ आणि जलद होणे
 • जमिनीच्या व्यवहारांमध्ये होणारी फसवणूक टाळणे
 • या योजनेची अंमलबजावणी यशस्वीरित्या झाल्यास राज्यातील जमिनीच्या व्यवहारांमध्ये क्रांती घडून येण्याची शक्यता आहे.

 

Old Land Records maps 2024

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

 

 

Leave a Comment