Join WhatsApp Group

Maratha Andolan: मराठा आंदोलनाचा सिनेस्टाईल थरार; तरुणाने भररस्त्यात जाळली नवीकोरी बाईक; पाहा VIDEO

Maratha Andolan: मराठा आंदोलनाचा सिनेस्टाईल थरार; तरुणाने भररस्त्यात जाळली नवीकोरी बाईक; पाहा VIDEO

Maratha Andolan : राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मात्र, सरकारचा हा निर्णय फसवा असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. सरकारने सगेसोयरे अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी देखील जरांगेंनी केली आहे.

 

पाहा VIDEO

 

या मागणीसाठी आज (२४ फेब्रुवारी) राज्यातील गावागावात रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागलंय. जालन्यात मराठा आंदोलकांनी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांमध्ये चांगलीच झटापट झाली. (Latest Marathi News)

desi Jugaad car :हे जुगाड पाहून इंजिनियर फाडतील डिग्री बाईक इंजिन आणि भंगार मटेरियल पासून बनवली फोर व्हीलर

यावेळी पोलिसांनी २५ मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलं. दुसरीकडे नांदेडमधील (Nanded News) एका तरुणाने राज्य सरकारचा निधेष करत भररस्त्यात पेट्रोल टाकून आपली नवीकोरी दुचाकी जाळून टाकली. या थरारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.शिवहरी लोंढे असं दुचाकी जाळणाऱ्या मराठा तरुणाचं नाव असून तो नांदेडच्या लोंढे सांगवी येथील रहिवासी आहे. नांदेडमध्ये सुरू असलेल्या रास्तारोको आंदोलनात शिवहरी हा सहभागी झाला होता. यावेळी काही आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून सरकारचा निषेध केला.

पाहा VIDEO

काहीही झालं, तरी आपण सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करायचं नाही, असा निर्धारच शिवहरीने केला. मग काय त्याने आपली नवीकोरी दुचाकी थेट उस्मान नगर रस्त्याच्या मध्यभागी उभी केली आणि पेट्रोल टाकत ती जाळून टाकली. सध्या या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Leave a Comment