Join WhatsApp Group

पीएम व नमो शेतकरीचे ६००० रु.आले नाहीत लगेच करा हे काम | Namo Shetkari Beneficiary Status

पीएम व नमो शेतकरीचे ६००० रु.आले नाहीत लगेच करा हे काम | Namo Shetkari Beneficiary Status

Namo Shetkari Beneficiary Status नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो काल दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्यातील अनेक शेतकऱ्यांना पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. यामध्ये राज्यभरातून सुमारे 90 लाख शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे.

परंतु अनेक लाभार्थी शेतकऱ्यांना अद्यापही या योजनेचा हप्ता मिळाला नसल्याचे समोर येत आहे. तर अनेक शेतकऱ्यांना 2000 रुपये,4000 रुपये जमा झाले आहेत तर असे का होत आहे यामागे काय कारण आहे आणि शेतकऱ्यांनी काय केल्यावर सदरील हप्ते जमा होणार याबाबतची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

 

नमो शेतकरी लाभार्थी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

E-Pik Pahani List 2024
तुमचा स्टेटस पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Namo Shetkari Yojna 2 Installment List
शेतकरी मित्रांनो देशातील सुमारे 09 कोटी शेतकऱ्यांना काल दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी पीएम किसान या योजनेचा सोळावा हप्ता दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. यासाठी काल यवतमाळ मध्ये झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते या निधीचे वितरण करण्यात आले. आणि या योजनेला सोबतच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे देखील हप्ते जमा करण्यात आले.

नमो शेतकरी योजनेसाठी राज्यातील पात्र असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना दुसरा व तिसरा हप्ता एकत्र दिल्याने या योजनेचे 4000 रुपये शेतकऱ्यांना मिळाले आणि पीएम किसान चे 2000 रुपये असे एकूण 6000 रुपये महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत.

या शेतकऱ्यांना आज रात्री किंवा उद्या पैसे जमा होणार –

शेतकरी मित्रांनो काल रात्री उशिरा या योजनेसाठी हप्त्याचे वितरण करण्यात आल्यामुळे अजूनही अनेक शेतकऱ्यांना पैसे जमा होत आहेत. याचे कारण म्हणजे अनेक बँकांमध्ये सर्वर प्रॉब्लेम असल्या कारणाने शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास थोडा वेळ होत आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी एक बाब लक्षात घ्यायला हवी की सदरील हप्त हे २००० रुपये प्रमाणे जमा होतात.

Namo Shetkari Yojana Beneficiary List Pdf
त्यामुळे आज दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपयाचे हप्ते जमा होत आहेत. याबाबत आज रात्री तसेच उद्या देखील काही राहिलेल्या शेतकऱ्यांना सदरील निधी मिळणार आहे यासाठी शेतकऱ्यांनी बँकेत किंवा कुठेही जाण्याची आवश्यकता नसणार आहे.

या शेतकऱ्यांना मिळाले केवळ २००० रु –

शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांना केवळ पी एम किसान या योजनेचेच २००० रुपये जमा करण्यात आले आहेत आणि त्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ देण्यात आला नाही याबाबतचे मुख्य कारण म्हणजे नमो शेतकरी योजना ही नवीन आहे आणि याचा डेटाबेस अपडेट चे काम अजूनही सुरू आहे. त्यामुळे पी एम किसान लाभार्थी यादी व नमो शेतकरी लाभार्थी यादीमध्ये देखील स्पष्ट फरक दिसत आहे.

ज्या शेतकऱ्यांचा डेटाबेस अद्यापही नमो शेतकरी योजनेकडे अपडेट नाही अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ अजूनही सुरू करण्यात आला नाही आणि त्यामुळे काही शेतकऱ्यांना केवळ २००० रुपयेच मिळणार आहेत.

Namo Shetkari yojana Status
या शेतकऱ्यांना मिळाले ४००० रु –

नमो शेतकरी योजनेच्या हफ्ता वितरणाच्या शासन निर्णयाबद्दल तुम्ही पाहिजे असल्यास एका शासन निर्णयामध्ये १७९२ कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे तर दुसऱ्या शासन निर्णयामध्ये २००० कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे याचाच अर्थ अद्यापही डेटाबेस अपडेट चे काम सुरू असल्याने ज्यांचा डेटा अपडेट आहे केवळ त्या शेतकऱ्यांना या योजनेचे हप्ते वितरित करण्यात आले आहेत.

शेतकरी मित्रांनो याचा स्टेटस तपासण्यासाठी तुम्हाला पीएम किसान च्या वेबसाईटवर जाऊन तुमचा बेनिफिशरी स्टेटस चेक करायचा आहे आणि यामध्ये ई केवायसी, लँड सीडींग आणि आधार बँक सीडिंग स्टेटस या तीन गोष्टी तपासायच्या आहेत या तीनही गोष्टी बरोबर असल्यास तुम्हाला पुढील काही दिवसात डेटा अपडेट झाल्यानंतर हप्ते जमा होणार आहेत.Namo Shetkari Beneficiary Status

E-Pik Pahani List 2024

नवीन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment