Join WhatsApp Group

police recruitment 2024 :तरुणांनो, तयारीला लागा..! पोलिस भरतीसाठी 5 मार्चपासून अर्ज भरण्यास सुरवात; गृह विभाग 17000 पदे भरणार

police recruitment 2024 :तरुणांनो, तयारीला लागा..! पोलिस भरतीसाठी 5 मार्चपासून अर्ज भरण्यास सुरवात; गृह विभाग 17000 पदे भरणार

police recruitment 2024 मराठा समाजाच्या १० टक्के आरक्षणाचा शासन निर्णय होताच गृह विभागाने राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये एकूण १७ हजार पोलिस पदांची (चालक व शिपाई) भरती काढली आहे. भरतीच्या जाहिराती उद्या (शुक्रवारी) प्रसिद्ध होणार असून ५ ते ३१ मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत.

सोलापूर : मराठा समाजाच्या १० टक्के आरक्षणाचा शासन निर्णय होताच गृह विभागाने राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये एकूण १७ हजार पोलिस पदांची (चालक व शिपाई) भरती काढली आहे. भरतीच्या जाहिराती उद्या (शुक्रवारी) प्रसिद्ध होणार असून ५ ते ३१ मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. ‘सकाळ’ने त्यासंदर्भात सतत पाठपुरावा केला होता आणि १८ फेब्रुवारीला ‘गृह विभागातर्फे आचारसंहितेपूर्वी १७ हजार पोलिसांची मेगाभरती’ या मथळ्याखाली वृत्त देखील प्रसिद्ध केले होते.

gpay app update 2024

1 मार्च पासून दुचाकी चालकांना बसणार ₹ 25,000 चा दंड, बाहेर जायच्या आधी हे नवीन नियम पहाच

police recruitment 2024 राज्यातील विविध शहर- जिल्ह्यांची वाढलेली लोकसंख्या व विस्तार, गुन्हेगारीतील वाढ, नवीन पोलिस ठाण्यांचे प्रलंबित प्रस्ताव, सध्याची सामाजिक स्थिती या पार्श्वभूमीवर गृह विभागाकडील सध्याचे मनुष्यबळ कमी पडत असल्याची वस्तुस्थिती आहे. सेवानिवृत्त कर्मचारी, अपघाती मृत्यू, स्वेच्छानिवृत्ती अशा कारणांमुळे पण पोलिसांची पदे रिक्त झाली आहेत. दुसरीकडे सोलापूरसह राज्यातील बहुतेक जिल्ह्यांनी जवळपास ३०० नवीन पोलिस ठाण्यांच्या मागणीचे प्रस्ताव पोलिस महासंचालकांना पाठविले आहेत. पण, मनुष्यबळाअभावी त्यावर निर्णय झालेला नाही.

gpay app update 2024

शेतकऱ्यांसाठी खुशखबर!एकाचवेळी केंद्र आणि राज्याचे मिळून 6 हजार रुपये खात्यात जमा..

या पार्श्वभूमीवर बरोबर १२ महिन्यांत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली दुसरी मोठी पोलिस भरती आता होत आहे. यापूर्वी १८ हजार पदांची झाली असून आता १७ हजार पदांची भरती केली जात आहे. दरम्यान, उन्हाळा संपल्यानंतर जून-जुलैमध्ये सध्याच्या भरतीला सुरवात होईल. तत्पूर्वी, उमेदवारांकडून ३१ मार्चपर्यंत अर्ज भरून घेतले जाणार आहेत. पहिल्यांदा मैदानी व शेवटी लेखी परीक्षा होणार असून परीक्षेच्या निकालानंतर नोव्हेंबरमध्ये या निवड झालेल्या नवप्रविष्ठांचे प्रशिक्षण सुरु होईल.

अशी होणार नवीन पदभरती

पदनाम भरतीतील पदे

जेल शिपाई

१,९००

एमआरपीएफ

४,८००

पोलिस शिपाई

१०,३००

एकूण

१७,०००

ठळक बाबी…

– राज्यातील १० पोलिस प्रशिक्षण केंद्रात २६ फेब्रुवारीपासून सहा हजार नवप्रविष्ठ पोलिसांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. नोव्हेंबरमध्ये प्रशिक्षण संपल्यावर नवीन भरती झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होईल.

– जून-जुलैमध्ये सर्वांचीच एकाचवेळी परीक्षा होईल. पहिल्यांदा मैदानी, त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. उन्हाळ्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी जून-जुलैमध्ये घेतली जाणार आहे.

– राज्यातील सर्वच प्रशिक्षण केंद्रांची क्षमता वाढणार असून पूर्वी १० प्रशिक्षण केंद्रांची क्षमता सहा हजार होती. मागच्यावेळी ही क्षमता आठ हजार ६०० झाली, आता सरकारच्या मान्यतेने आणखी पाच हजाराने क्षमता वाढणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात १४२ पोलिसांची भरती

शहर पोलिस दलातर्फे ३२ पोलिस शिपाई व १६ पोलिस चालकांची भरती होणार आहे. तर सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून ८५ पोलिस शिपाई आणि नऊ पोलिस चालकांची पदे भरली जाणार आहेत. त्याची जाहिरात शुक्रवारी प्रसिद्ध केली जाणार असून ५ मार्चपासून उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

Leave a Comment