Join WhatsApp Group

Rine alert पंजाबराव डख म्हणतात या भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट

Rine alert पंजाबराव डख म्हणतात या भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट

Rine alert मराठवाड्यातील प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दि. 04/फेब्रवारी रोजी शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस तसेच गारपिटीचा इशारा असुन काही भागात ढगाळलेले वातावरण निर्माण होणार असल्याचे डख यांनी आपल्या अंदाजा मध्ये सांगितले आहे. (Panjab dakh havaman aandaj february)

हे वाचा – या जिल्ह्याला 191 कोटींची मदत जाहीर ; दोन तालुके वगळले पहा सविस्तर

सध्या अनेक शेतकऱ्यांची हरभरा तसेच ज्वारी काढणीला आली आहे. आणि आता अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज पाहून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पाहुया पंजाबराव डख यांनी कोणत्या भागात अवकाळी पावसाची तसेच गारपिटीची शक्यता वर्तवली आहे.

हे वाचा – तुमच्या सोलार पंपाच्या अर्जाची स्थिती पहा मंजूर, रिजेक्ट, त्रुटी, पेमेंट, प्रतीक्षेत ऑनलाईन

 

पंजाबराव डख म्हणतात दि. 11/फेब्रुवारी पासून ते 14 फेब्रुवारी पर्यंत विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अकोट, अकोला, हिंगोली, या भागात अवकाळी पाऊस तसेच काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवली आहे. मराठवाड्यातील परभणी तसेच परीसरात पावसाची शक्यता असुन उर्वरित मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहिल.

हे वाचा – नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची यादी पहा

शेतकऱ्यांनी काढणीला आलेले हरभरा ज्वारी तसेच इतर पिके 10/फेब्रुवारी पर्यंत काढून सुरक्षित झाकून ठेवावी आणि नुकसानीपासुन वाचावे. कलिंगड, खरबूज लागवड केलेल्या शेतकऱ्यांना आता मोठी चिंता लागली आहे. पंजाबराव डख म्हणतात अचानक वातावरणात काही बदल झाला तर मेसेज व्दारे कळवले जाईल.

 

 

Leave a Comment